औरंगाबाद । वार्ताहर
रोहित पवार युवा ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या मराठवाडा संघटक पदी दिक्षा पवार यांच्या निवडीचे पत्र प्रदेशअध्यक्ष नवनाथ देवकते यांनी दिले आहे.रोहित पवार युवा ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य या संघटनेचा माध्यमातून सुशिक्षित युवकांना संघटित करून त्यांना राजकीय, सामाजिक, क्षेत्रात आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचा आमदार रोहितदादा पवार यांचा दृष्टीकोन आहे. तसेच निवडीचा पत्रात फुले, शाहु, आंबेडकरांचे विचार व आ. रोहितदादा पवार यांचे कार्य तळागाळातील लोकांपर्यत पोहचुन, युवकांची फळी तयार करून संघटना वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. निवड झाल्या बद्दल आमदार रोहित पवार, आमदार सतीश चव्हाण, प्रदेश अध्यक्ष नवनाथ देवकते आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave a comment