रहिमाबाद । वार्ताहर
गेल्या दोन दिवसांपासून परिसरात सतत धुवाधार पाऊस पडत असून सर्वाधिक पाऊस पडल्याची या वेळेस नोंद झाली असल्याचे समजले.
तालुक्यात या दोन दिवसांपासून पावसाने धुवाधार बेटींग केली असून तालुक्यातील सिल्लोड मंडळात 68, भराडी 27, आभई 71,अजिठा 73,गोळेगाव 45,आमठाणा 46,निल्लोड 36 आणि बोरगाव 52 असा ऐकून आठ मंडळात एकाच दिवसात सरासरी 418 मी मी पावसाची नोंद झाली तर पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत तालुक्यात एकूण 3849 मी मी पाऊस पडला असून या मुळे जवळपास सर्वच छोटे मोठे धरण पूर्ण भरले असल्या मुळे खेळणा,पूर्णा, अंजना या प्रमुख नद्यांना भरभरून पूर आलेले पहावयास मिळत आहे .या पावसामुळे नुकसानही तेवढेच पहावयास मिळत असून मका हे पीक अंधारी पळशी भागात पूर्णपणे आडवे झाले असून पालोद परिसरासह अन्य ठिकाणी कपाशी हे पीक जास्तीच्या पावसाने पिवळे पडलेले पहावयास मिळत आहे .
Leave a comment