दोनच वर्षात रस्त्याचे झाले तीनतेरा
फर्दापूर । वार्ताहर
शुक्रवारी सायंकाळी फर्दापूर(ता.सोयगाव) परीसरात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे सावरखेडा घाटात भली मोठी दरड कोसळून घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचून गेल्याने सावरखेडा गावाचा संपूर्ण तालूक्या शी संपर्क तुटला आहे या पावसाळ्यात सावरखेडा घाटात दरड कोसळून रस्ता बंद होण्याची ही सलग दुसरी घटना असून घाटात वारंवार घडणार्या दरड कोसळण्याच्या घटनांन मुळे घाटाच्या बोगस कामाचे पितळ उघडे पडतांना दिसत आहे.
फर्दापूर परीसरात पावसाने महिनाभरापासून दडी दिलेली असतांना दि.24 शुक्रवारी सायंकाळी अचानक परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले सुमारे तास दिड तास या पावसाने संपूर्ण फर्दापूर परीसराला झोडपून काढले या पावसाच्या तडाख्यात सावरखेडा घाटातील एक भलीमोठी दरड रस्त्यावर कोसळून दरडीतील दगड व मातीमुळे घाटातील रस्ता पूर्ण पणे बंद झाला दरम्यान या धुव्वाधार पणे बरसलेल्या पावसामुळे सावरखेडा घाटातील रस्त्या लगत चा भराव वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचल्याने सावरखेडा गावाचा फर्दापूर सह सोयगाव तालूक्याशी जवळपास संपर्कच तुटून गेल्याचे दिसून येत आहे.दरम्यान अजिंठालेणीच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या सावरखेडा गावाला सोयगाव तालूक्याशी जोडणारा हा एकमेव रस्ता आहे मात्र रस्त्याचे काम अत्यंत बोगस पध्दतीने झाल्यामुळे घाटात दरडी कोसळून हा रस्ता वारंवार बंद पडत असल्याने सावरखेडा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून हे बोगस काम करणार्या ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी येथील नागरिकांन कडून करण्यात येत आहे.
Leave a comment