पाचोड । वार्ताहर
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सण साजरा करण्यासाठी नियमाचे बंधन लावण्यात आलेली आहे तसेच अनेक जणांनी घरात राहून साजरी करण्याचे प्रशासनाचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाचोड ता.पैठण येथील शिवाजीनगर येथील बच्चे कंपनीने सोशलिस्ट पळून व संपूर्ण नियमाचे पालन करून आज नागपंचमी उत्सव साजरी केल्याचे छायाचित्र दिसत आहे.
तसेच नागपंचमी सणाच्या मुहूर्तावर पाचोड परीसरातील सकाळ पासून महीलांनी नागदेवतेची विधीवत पुजा केली. नागपंचमी सण हा महिलांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो परंतु यंदा काही मर्यादा लागल्यामुळे त्यामुळे महीला वर्गात नाराजी पसरली आहे. पहाटेपासून महीलानी व पुरुषांनी तोंडाला मास्क सोशलडिस्टींगचे पालन करत वाळूराची मनोभावे पूजा केली आहे.
Leave a comment