पाझर तलावाची बोगस काम करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कार्यवाही कराः अनिता वानखडे

पाचोड । वार्ताहर

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैठण तालुक्यातील अब्दुल्लापुर येथील पाझर तलावाच्या बांधाला तडे गेलेले असून या तलावाच्या पाण्याखाली जवळपास 200 ते 250 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. पावसाळ्यात जर मुसळधार पाऊस झाला तर बांध फुटून या संपूर्ण क्षेत्रातील फळ बागा व उभी पिकांची मोठी हानी होईल.

या तलावामध्ये येणार्‍या पावसाच्या पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतांना देखील संबंधित विभागाने किंवा तालुका प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी या तलावाची पाहणी करून योग्य वेळी याची दुरुस्ती देखभाल करून घेतली असती तर आज जी परिस्थिती या पावसामुळे तलावाच्या भिंतीला तडे गेले नसते परंतु या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच या तलावाची धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातच कोरोना महामारीने देश संकटात सापडला आहे. त्यात परत हे संकट शेतकरी आत्महत्या वाढतील स्थानिक प्रशासनाने या बाबतची संपूर्ण माहिती तात्काळ घेऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे शेतकर्‍यांची मोठी हानी टाळण्यासाठी या बांधाची डागडुजी चे काम तात्काळ करणे गरजेचे आहे.करिता संबंधित अधिकार्‍यांनी या विषयी गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी अनिता वानखडे यांनी तहसीलदार यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.