औरंगाबाद । वार्ताहर
खूनाचा प्रयत्न करून फरार असलेल्या आरोपीला जिन्सी पोलिसांनी मुकुंदवाडी परिसरातील जयभवानीनगर येथे पकडले. पोलिसांना बघताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला पकडलेच. यामध्ये मुकुंदवाडी पोलिसांची देखील मदत झाली.
नेमके प्रकरण असे की 29 जून रोजी कैलासनगर येथील स्मशानभूमिजवळ योगेश देवीदास मुळे हे उभे असताना जुन्या वादातून 4 ते 5 जणांच्या घोळक्याने त्यांच्यावर चाकू आणि फावड्याने प्राणघातक हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना त्वरित घाटी येथे हलविण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यावेळी जिन्सी पोलिसांनी 1) शुभम किरण शर्मा (रा.कैलासनगर),2) अजय भाऊसाहेब गात (रा.बायजीपुरा), 3) सूरज विलास गायकवाड़ (रा.बौद्धवाडा,गोधड़ीपुरा), 4)सुमीत किरण शर्मा (रा.कैलासनगर) यांचा त्वरीत शोध घेऊन अटक केली. परंतु आरोपी सागर विक्रम केशभट्ट (22, रा.बायजीपुरा) हा तेव्हापासून फरार होता. जिन्सी गुन्हेशोध पोलिसांनी त्याची गुप्त माहिती काढून काल त्यास अटक केली. गुह्याचा पुढील तपास सपोनी.साईनाथ गीते हे करीत आहेत. सदरील कारवाई जिन्सी पोलीस स्टेशनचे निरीक्षक व्ही.एम.केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि त्यांच्या सहकार्यानी यशस्वी पार पाडली.
Leave a comment