औरंगाबाद । वार्ताहर
वर्षभर विविध नवनवीन उपक्रम राबवणार्या जैन टॅग या ग्रुपच्या पदाधिकार्यांच्या पदग्रहण सोहळा ऑनलाइन पार पडला या ऑनलाईन पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून वाँवच्या संस्थापिका रुचिरा दर्डा व जैन पंचायतचे अध्यक्ष ललित पाटनी यांची उपस्थिती होती.
नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षा डॉ.याशिका पांडे उपाध्यक्ष मोनिका चांदीवाल सचिव स्वाती कासलीवाल कोषाध्यक्ष दिपाली पांडे यांनी पदभार स्वीकारला मावळक्तया अध्यक्षा रीना ठोले यांनी मागील वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली रुचिरा दर्डा यांनी सांगितले की कोरोना चा हा कठीण काळही नवनवीन संधी घेऊन येईल यासाठी सर्वांनी सकारात्मक राहणे आवश्यक आहे सकारात्मक राहिल्याने आनंद मिळतो असेही त्यांनी नमूद केले तसेच वर्षभर विविध उपक्रम राबविल्याबद्दल सोहळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी ग्रुप चे कौतुक केले प्रारंभी जैन ग्रुपचा संथापिका अध्यक्षा अनुपमा दगडा व दीपिका बडजाते यांनी सर्वांचे स्वागत केले ऑनलाइन सोहळ्याचे सूत्रसंचालन स्वाती कासलीवाल यानी केले. यशस्वीतेसाठी युक्ता पांडे व आदित्य कासलीवाल यांनी परिश्रम घेतले सर्व सदस्य ऑनलाइन हजर होते अशी माहिती प्रचार-प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल दिली.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment