भराड़ी । वार्ताहर
सराटी येथील राशन दुकानदार तसेच पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे यांच्या विरोधात संतोष लहाने यांच्यासह ग्रामस्थांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच उपविभागीय अधिका-यांकडे तक्रार दाखल करताच प्रशासन खडबडून जागे झाले असुन सदरील राशन दुकान निलंबित करण्यापाठोपाठ पोलिस पाटील सुंदर गुळवे यांनी पिंपळदरी शिवारातील गट नंबर 181 मधील गायरान जमीनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असुन चौकशीअंती पोलिस पाटील पदही धोक्यात येणार आहे .
सराटी गावातील एका महिलेने तर माझ्या पतीने पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे यांच्या ञासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार पोलिस अधीक्षक,- उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलिस ठाणे -अजिंठा यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार केली होती. पिंपळदरी शिवारातील अनेक हेक्टर गायरान जमीनीवरही पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे यांनी अतिक्रमण केले असल्याच्या तक्रारी असुन संबंधित चौकशींसंदर्भात उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने चौकशीअंती पोलिस पाटील पदही धोक्यात आले आहे.
Leave a comment