सिल्लोड। वार्ताहर
महसूल व ग्राम विकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या हस्ते दि 19 जुलै 2020 रोजी मदरसा सलीममिया मंगरूळ फाटा सिल्लोड व प्राथमिक आरोग्य केंद्र शिवना येथे नवीन कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. सदर उद्धघाटन वेळेस ,उप विभागीय अधिकारी (महसूल ), गट वि.अधिकारी पं.स, ना.तहसीलदार व इतर विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते
सिल्लोड तालुक्यामध्ये आज 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे, बिलाल नगर (1), समता नगर (1), जामा मस्जिद जवळ (1) ,टिळक नगर (1), केळगाव (1), आजपर्यंत सिल्लोड तालुक्यामध्ये एकूण 196 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी आज सिल्लोड तालुक्यातील एकूण 16 रुग्ण बरे झाले असून एकूण सिल्लोड तालुक्यामध्ये आज पर्यंत एकूण 62 कोविड रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . 125 रुग्णाचा उपचार उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड , दुर्गामाता मंगल कार्यालय सिल्लोड, ग्रामीण रुग्णालय अजिंठा, सीसीसी नगरपरिषद सिल्लोड व औरंगाबाद येथील घाटी, सिव्हिल हॉस्पिटल, हेडगेवार रुग्णालय, व एम जी एम रुग्णालय येथे चालू आहे व 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सिल्लोड शहरांमध्ये आज पर्यंत एकूण 62 रुग्ण सिल्लोड ग्रामीण मध्ये 134 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
Leave a comment