वैजापुर । वार्ताहर
जि.प. प्रा.शा. थोरात वस्ती कावा रोड विरगाव ता.वैजापुर जि. औरंगाबाद येथे दि.18 जुलै रोजी येथे आ.प्रा.रमेश पाटील बोरनारे सर यांच्या प्रयत्नातून महावितरण विधुत मडळ यांच्या कडून 1लाख 5 हजार रुपयांचे विद्युतपोल मंजुर होऊन शाळेसाठी लाईट कार्यान्वित करण्यात आली तसेच र्ई-लर्निग संगणक कक्ष यांचे ही उद्घाटन करण्यात आले. यासाठी आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रा.रमेश बोरनारे सर आमदार वैजापूर. गंगापूर, अविनाश पाटील गलांडे शिक्षण सभापती औरंगाबाद, दिनेशभाऊ परदेशी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक वैजापूर, बाबासाहेब पाटील. जगताप माजी सभापती तथा उपजिल्हाप्रमुख शिवसेना औरंगाबाद, पंकजभाऊ ठोंबरे जिल्हा परिषद सदस्य औरंगाबाद, नानासाहेब पाटील थोरात सरपंच तथा विभाग प्रमुख शिवसेना विरगाव, नितीन भागवत सर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment