सिल्लोड । वार्ताहर
कोरोना सारखी महामारीचा मुद्दा समोर महाराष्ट्र राज्य सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी सिल्लोड तालुका लागू केल्यामुळे सिल्लोड तालुका व शहर काँग्रेस पक्ष तर्फे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्याणराव काळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिल्लोड येथील महाराणा प्रताप चौकातील इंद्रिराज्य महाविद्यालय व कोहिनूर कॉम्पलेक्सच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले हे वृक्षारोपण करून सिल्लोड तालुका व शहर काँग्रेस पक्ष एक उपक्रम सुरू केल्यामुळे यूवकात व विद्यार्थ्यांना नवीन दिशा देण्याचे कार्य सुरू केले आहेत.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या हाताने गोरे गरीबांची सेवा होऊ अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली व पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा फोन द्वारे देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष भास्कर घायवट पाटील, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्ष चे सरचिटणीस कैसर आझाद शेख उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल, सिल्लोड शहर अध्यक्ष शेख फेरोज अकबर, अपंग कल्याण समिती के जेष्ठ समाज सेवक शेख मोहम्मद नसीर नूर, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष शेख फरमान कुरेशी, कृष्णा जाधव, योगेश राऊत, शेख आवेस आझाद, मंगेश कळम, सय्यद नदीम, शेख जूबेर, शकील मंसूरी, शेख तौफीक, शेख रफिक, आदि उपस्थित होते.
Leave a comment