औरंगाबाद । वार्ताहर

स्कोडा ऑटो इंडियाच्या वतीने त्यांचे सर्वात धमाल वाहन, रायडर प्लसचे नवे वेरीयंट रॅपीड टीएसआयचे अनावरण करण्यात आले. या वाहन प्रकारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत रु 7.99 लाख असून  त्यांनी देशभरात ‘वन नेशन, वन प्राईज’ (एक देश, एक किंमत) तत्वज्ञान पोहोचले आहे. नवीन स्कोडा ऑटोच्या वतीने ब्रँडचे सदाबहार डिझाईन आदर्श, अद्वितीय कामगिरी, सर्वोत्तम गुणवत्तापूर्ण बांधणी, अनोखा वॅल्यू फॉर मनी’ (किंमतीचा योग्य परतावा देणारा) प्रस्ताव आणि वृद्धिंगत सुरक्षा तसेच संरक्षण यांचा सुयोग्य संगम देऊ करण्यात येतो आहे. रॅपीड रायडर प्लस कँडी व्हाईट, कार्बन स्टील, ब्रिलीयंट सिल्व्हर तसेच टॉफी ब्राऊन अशा चार रंगांत देशातील सर्व अधिकृत स्कोडा ऑटो विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.   

 नवीन स्कोडा रॅपीड रायडर प्लसविषयी बोलताना स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर झॅक होल्लीस म्हणाले की, स्कोडा ऑटो इंडियाने अलीकडेच नवीन रॅपीड टीएसआय उत्पादन श्रेणी उपलब्ध करून दिली आहे. आता बसविण्यात आलेले अत्याधुनिक स्वरूपाचे 1.0 टीएसआय पेट्रोल इंजिन अद्वितीय शक्तिशाली आऊटपूट तसेच सर्वोत्तम किफातशीर इंधन पर्याय देऊ करतो. या ब्रँडवर प्रेम असणार्‍या चाहत्यांकडून तसेच वाहन प्रेमींकडून देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच या झेक बनावटीच्या उत्पादनाने पाऊल पुढे टाकत रॅपीड उत्पादन श्रेणीचा विस्तार केला. रायडर प्लसद्वारे ब्रँडचे चाहत्यांच्या पसंतीला साद घालणारे डिझाईन, अद्वितीय अंतर्गत सजावट आणि गुणवत्तापूर्ण सुरक्षा वैशिष्ट्ये फारच स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध करून देण्यात आले. आपल्या वाहन प्रकारात कार्यक्षमता, तर्कसुसंगत आणि प्रशस्त मापदंडांचे अनुसरण करत असल्याने हे उत्पादन सर्वोत्तम विक्रीच्या दृष्टीने पात्र ठरते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.