साठ ब्रास वाळू विकले यावर तहसिलदारांची धडक कारवाईअठरा लाखांचा दंड

पाचोड । वार्ताहर

हिरडपुरी ता.पैठण येथिल गोदावरी नदी पात्रातुन वाळू उत्खनन करून विक्री करण्यात आल्याने पैठण तहसीलदारांनी आपल्या पथकासह धडक कार्यवाही केली ही मोहीम शुक्रवारी दि17 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान केली असून या कार्यवाहीत साठ ब्रास वाळू चोरून विकल्या प्रकरणी अकरा जणांवर कारवाई करण्यात आली असुन 18 लाख रुपयेचा दडं करण्यात आला आहे. सदरील कारवाईने वाळू तस्करांत खळबळ माजली आहे. महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासन कोरोना महामारीच्या मदत कार्यात व्यस्त असल्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेत वाळूतस्करांनी तालुक्यात वाळू उत्खननाचा हैदोस मांडला होता. तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून बिनदिक्कतपणे बेसुमार वाळू उत्खनन करून विक्री व साठवणूक केल्या जात होती.तसेच काही वाळू चाळीस -पन्नास हजाराला सहा ब्रास वाळ विक्री करून वारेमाप पैसा या वाळूतस्करांनी दरम्यानच्या काळात कमावला आहे. 

तालुक्यात रात्री नऊच्या नंतर वाळूचे उत्खनन होत होते रात्री-अपरात्री विहामांडवा परिसरात  मोठ्या प्रमाणात वाहने चालत होती. दरवर्षाप्रमाणे लिलाव न झाल्यामुळे तस्करांचे चांगलेच फावले होते. आपल्या आलिशान वाहनातून पेट्रोलिंग करत पाठीमागून वाळू भरलेल्या गाड्या पास करन्यात येत. मनात कुठलीही भीती न बाळगता यंत्राद्वारे नदिना पोखरण्याची काम सुरू होते. कोरोना महामारीच्या मदत कार्यातून थोडासा वेळ काढत पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके मंडळाधिकारी तलाठी यांनी तालुक्यातील हिरडपुरी गट नबंर 189 व 190 जवळील पाहणी केली असता तेथिल दहा ते पंधरा वेगवेगळ्या ठिकाणी वाळूची खट्टे पडल्याचे दिसुन आले येथील असता सदरिल वाळू स्वप्निल सुरेश गांधाळे,2)सुभास गंगाधर गांधळे,3)विकास विष्णू गांधळे,4)गोरख वामन भोसले,5)नानासाहेब सुर्यभान दवेकर,6)रामेश्वर अनिल गांधळे,7)इस्लम शेख,8)इम्रान पठाण,9)तालेब कडुबा शेख,10)कल्याण आप्पासाहेब गरड,11)किसन श्रीमंत भंडारे यांनी ट्रँकरध्दारे वाळू चोरटी करून विकली आहे यांच्यावर तहसिलदारानी धडक कार्यवाही केली. यावेळी येथे या कार्यवाहीने वाळूतस्करांचे धाबे दणाणले असले तरी तालुक्यात आणखी वाळू तस्करांच्या मुसक्या बांधण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.