दररोजच निघतात बाधीत रूग्ण .मात्र सामान्य नागरिकांचे होतायत हाल
पैठण/प्रतिनिधी :- नंदकिशोर मगरे
लोकप्रतिनिधी व मुठभर व्यापारी वर्गाने बैठक घेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पैठण शहर आठ दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवार पासून आम्लात आणून नागरिकावर थोपावला गेला खरे मात्र ज्याचे हातावर पोट आहे अशा नागरिकांचे मात्र खाण्या पिण्याचे वांदे झाले असून या लोकावर उपासमारीची वेळ आली आहे .
सद्यस्थितीत शहरात कोरोनाचे रूग्ण रोज आढळून येत आहे .बाधीतांची साखळी तोडली जावा यासाठी खबरदारी म्हणून जनता कर्फ्यूच्या नावाखाली लोकप्रतिनिधी व मुठभर व्यापारी वर्गाने सहभाग घेवून लॉकडाऊन जाहिर केला आहे .परंतू बाधीत रूग्णांची संख्या थांबता थांबत नसून रोज नविन रूग्ण शहरात निघत आहे.त्यातच सामान्य नागरिकांचा व छोट्या व्यापा-यांचा कुठलाच विचार न करता लाधलेल्या या लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांची मोठ्याप्रमाणात उपासमारी होतांना दिसत आहे.डॉकडाऊन सुरू होवून चौथा दिवस पार पडला आहे .आणखी पुढील चार दिवस कसे काढावे या चिंतेत मजूर वर्ग दबक्या आवाजात टाहो फोडत आहे .लोकप्रतिनिधीनी सार्वजनिक निर्णय घेण्याअगोदर आमच्या कुटूंबाचाही विचार करणं अपेक्षीत होतं .मात्र ’ गांव जले हनूमान बाहर या म्हणी प्रमाणे याचे लोकप्रतिनिधी व मुठभर व्यापारी वर्गाला याचे सोयीर सुतक पण नसल्याचे दिसून येत नाही 22 मार्च पासून सलग तिन महिने केद्रसरकारने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन संपन्न केला होता .त्या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तालूक्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघात कोणीही उपाशी राहू नये याची खबरदारी खेत गरीब कुटूंबातील नागरिकांना अन्नधान्य वाटप केले होते मात्र पैठण शहर याला अपवाद ठरले असून लोकप्रतिनिधीनी नागरीकाकडे डोकावून देखील बघितले नव्हते .मग मर्जी प्रमाणे वागून आमच्यावर लॉकडाऊन का थोपावता असा सुर सामान्य नागरिकात निघत आहे
Leave a comment