बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगाव सारवाणी 1 व बोरगांव वाडी 10 असे कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे गावातील कोरोना बाधीत रूग्णाचा आकडा 11 झाला आहे,यामुळे परिसरातील नागरिक दहशती खाली वावरत आहे , ता.15 रोज बुधवारला एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रूग्ण आढळुन आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती, व त्यांच्या संपर्कात आलेल्या व होमक्वारन्टाईन केलेले बोरगांव वाडी येथील 15 जणाचा व आमठाणा येथील 4 असे एकुन 19 जणाचे ता.17 रोज शुक्रवारला बोरगाव वाडी येथे स्वँब घेण्यात आले.
त्यातील बोरगांव वाडी 12 स्वँब घेण्यात आले 1 पाँझिटिव्ह तर 11 निगेटीव्ह रिपोर्ट आले,बोरगांव सारवाणीतील 3 स्वँब निगेटिव्ह, तर आमढाणा 4 स्वँब घेण्यात आले होते ते सर्व निगेटिव्ह निघाल्याने बोरगांवकरांनी सुटकेचा निश्वास सोडला,या घेतलेल्या 19 स्वँबमुळे रुग्ण वाढता कि काय याकडे सर्वाचे गावकर्याचे लक्ष लागुन राहीले होते, आता बोरगांव वाडी मध्ये 10,.व बोरगांव सारवाणी मध्ये 1 असे एकुन 11 बाधीत रुग्ण झाले आहे, यातील 10 बाधीत रूग्णावर अजिंठा येथील कोविड सेंटर मध्ये तर 1 बाधीत रुग्णावर औरगांबाद येथे उपचार करण्यात येत आहे.अशी माहिती आरोग्य सेवक राजेद्र उमरिया यांनी दिली,तर स्वँब घेण्याचे काम आरोग्य कर्मचारी डॉ. अब्दुल समद,डॉ.एजाज पठान, डॉ.महाजन राजेद्र उमरिया यांनी केले. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी शासनाने ठरवुन दिलेल्या सर्व नियमाचे काटेकोर पणे पालन करा असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
Leave a comment