शेती माल विक्री साठी शेतक-यांची कसोटी
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी / अशोक कंटुले घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव सह परिसरात यावर्षी खरबूज व टरबूज लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती यावर्षी परिसरात पाणीपातळी बर्यापैकी असल्याने नगदी उत्पन्न म्हणून टरबूज खरबूज उत्पादकांनची संख्या यावर्षी वाढली आहे .नगदी पिक म्हणून पैशाची चणचणभासू नय ऐन उन्हाळ्यात घरखर्च, दावाखण्याचा खर्च,चिल्लर खर्चा-पाण्यासाठी मदत होईल या दृष्टिकोनातून अनेक शेतकऱ्यांनी काहार समाजातील शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांना शेती अर्धालिने उत्पन्न त्यानुसार खर्च शेतकऱ्यांनी पूर्ण करायचा व मिळालेल्या उत्तपन्नातुन तो काढून घ्यायचा परंतु यावर्षी कोरोणामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत असून केलेला खर्चही निघतो की नाही अशी धास्ती ग्राहक व व्यापारी नसल्याने वाढत आहे .
कोरोणा या विषाणु आजाराची उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यास अडचणी येत असून शेतकऱ्यांचा शेती माल विकण्यास हाल होत आहेत गावागावात बैलगाडीतून भाजीपाला टरबूज -खरबूज सह शेतीमाल हा मातीमोल भावात विक्री करावा लागत आहे .४० चाळीस रुपये टरबूज आजच्या परिस्थितीमध्ये १० दहा रुपयात विकावा लागत आहे. शेतकऱ्यांची शेती मालांची भाव कमी झाल्याने त्यांनी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे .
[ कुंभार पिंपळगाव येथे एक शेतकरी बैलगाडीतून टरबुजाची विक्री करताना छाया: अशोक कंटुले ]
Leave a comment