पैठण । वार्ताहर
भारतीय संविधान सुरक्षा परिषद प्रणित भारतीय संगीत संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रुपेश लोकडे यांच्या अध्यक्षतेखाली भिमरत्न परिवर्तनीय विचारांचे वादळ या ग्रुपचे भिम शाहीर सुरेश सदावर्ते यांची औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. भिम शाहीर सुरेश सदावर्ते हे सन 1991-92 पासून तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर बुद्ध, भिमगिते गायन करून सामाजिक प्रबोधनाचे कार्य अखंड पणे करीत आहेत.भिम गितांच्या माध्यमातून जनजागृती करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक चळवळ पुढे नेण्याचे काम अगदी मनापासून करत असून सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमातून त्यांनी भिम शाहीर सुरेश सदावर्ते म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. म्हणून तर त्यांना आजही पैठण तालुक्यातसह महाराष्ट्रभर भिमरत्न परिवर्तनीय विचारांचे वादळ या ग्रुपचे भिम शाहीर सुरेश सदावर्ते म्हणून ओळखत आहेत.
सदावर्ते यांनी शाहीरीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य चागल्या प्रकारे समाजात रूजवले आहे. यामुळे सामाजिक चळवळीत काम करणार्यांंना गितातुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे कशी न्यायची याची चालना मिळते.सामाजिक चळवळीला ऊर्जा देण्यासाठी समाजाला सामाजिक प्रबोधनाची आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे.यामुळे नवीन पिढी घडत आहे. या सर्व बाबींचा विचार करून भिमरत्न परिवर्तनीय विचारांचे वादळ या ग्रुपचे भिमशाहीर सुरेश सदावर्ते यांना भारतीय संगीत संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन केले राष्ट्रीय अध्यक्ष कु. पुजा जैसवार,राजेश कांबळे (मुंबई जिल्हा अध्यक्ष) .निखिल माने (मुंबई उप.जिल्हा अध्यक्ष) यांच्यासह पैठण तालुक्यातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते व भिम अनुयायी यांनी त्यांना पुढील वाटचालीस व कार्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सतिष बोरूडे ,चंद्रकांत पगारे ,संजय चाबुकस्वार ,सचिन पगारे ,राहूल पगारे ,दिलीप बर्फे ,संभाजी पगारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
Leave a comment