औरंगाबाद । वार्ताहर
दातृत्वाची परंपरा असलेल्या औरंगाबाद शहरात उशीरा का होईना प्लाझ्मा दान करण्याची सुरुवात घाटी रुग्णालयात सुरु झाली आहे. बाबरकॉलनी, कटकटगेट येथील रहीवाशी मोहंमद साले अमर बीनमाजी हे पुढाकार घेत पहीले प्लाझ्मादाता बनले आहे.
प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे कोणी येत नव्हते. त्यांनी हिंमत दाखवत घाटी रुग्णालयात प्लाझ्मादान केल्याने समाजात त्यांचे कौतुक होत आहे. यामुळे दोन जणांचे प्राण वाचू शकतात. कोरोनाबाधितांचा जीव वाचू शकतो. कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करावे, अशी विनंती बीनमाजी यांनी केली आहे. तसेच अर्जून बोर्डे, अतुल पवार, योगेश शिंदे, संतोष शेलकर यांनीही प्लाझ्मा दान केले आहे.
Leave a comment