सिल्लोड । वार्ताहर
नॅशनल एज्युकेशन शिक्षण सोसायटी सिल्लोड व इंदिरा शिक्षण प्रसारक मंडळ फर्दापूर संचलित कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले असून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत बाजी मारली आहे.
नॅशनल एज्युकेशन व इंदिरा शिक्षण मंडळाचा निकाल खालीलप्रमाणे नॅशनल मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंधारी ता. सिल्लोड चा निकाल विज्ञान शाखा 98.85%, कला शाखा 83.87%, एकूण सरासरी निकाल 94.91% , नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकरदन ता. भोकरदन चा निकाल विज्ञान शाखा 100 %, कला शाखा 83.33%, एकूण सरासरी निकाल 97.01 %, नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जमालशाह कॉलनी सिल्लोड चा निकाल विज्ञान शाखा 91.47 %, कला शाखा 79.12 %, एकूण सरासरी निकाल 86.36 %, नॅशनल मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जयभवानी नगर, सिल्लोड चा निकाल विज्ञान शाखा 96.87%, कला शाखा 83.67%, एकूण सरासरी निकाल 91.15%, माणिकराव पालोदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फर्दापुर ता. सोयगाव चा निकाल विज्ञान शाखा 95.48%, कला शाखा 78.64%, एकूण सरासरी निकाल 88.13% या प्रमाणे निकाल लागला आहे. इयत्ता 12 वी परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष ना.अब्दुल सत्तार, संस्थेचे सचिव युवानेते अब्दुल समीर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, नॅशनल शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रईस खान, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल आदींनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment