कोरोना बाधीत रुग्ण क्षेत्र कंटेंमेंट झोन जाहीर करून केले सील
बोरगांव बाजार । वार्ताहर
ग्रामिण भागात कोरोना या ससंर्गजन्य आजाराने थैमान घातला असुन बुधवारी ता.15 रोजी बोरगाव सारवाणी गावात पुन्हा 1 कोरोना बाधीत रूग्ण आढळल्याने सर्व परिसरात खळबळ उडाली आहे, सदरिल परिसर सिल करण्यात आला,संपर्कातील 4 जणाना होमक्वाँरन्टाईन करण्यात आले.
बोरगाव सारवाणीत पुन्हा 1 कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे,सर्व परिसर सिल करुन संपर्कात आलेल्या 4 जणाना होमक्वाँरन्टाईन करण्यात आले आहे, बोरगांव सारवाणी 1 रुग्ण व ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या बोरगांव वाडीमध्ये 9 कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने आता गावातील बाधीताची संख्या 10 झाली आहे. यातील बोरगांव सारवाणी येथील एक 55 वर्षीय इसम मागील आठ दिवसापासुन औरंगाबाद येथील एका खाजगी रुगणालयात उपचार घेत असताना त्याना कोरोनाची लागण झाली होती,व त्यांच्यावर पुढील उपचार औरगांबाद येथे चालु आहे तर बोरगाव वाडीतील 9 कोरोना बाधीत रुग्णावर अजिंठा कोविड सेंन्टर रुग्णालयात उपचार घेत आहे, यामुळे आता बोरगांव सारवाणी ग्रुप ग्रामपंचायत परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या 10 झाल्यामुळे सर्व परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे,सर्व परिसर कंटेंमेंट झोन जाहीर करून सील करण्यात आले आहे,अशी माहीती ग्रामसेवक शिवाजी गायके व आरोग्य सेवक राजेंद्र उमरिया यांनी दिली. शासन व प्रशासकीय यंञणेकडून कोरोना ससंर्गाची साखळी तोडण्यासाठी लाखो रूपयाचा खर्च होत आहे व सर्व प्रकारच्या उपाय योजना राबविल्या जात असतानाही कोरोना बाधीताचा वाढता आकडा हा नागरीकांच्या वतीने निष्काळजीपणा, सामाजिक अतंर न पाळने,तोडाला मास्क व रुमाल न वापरामुळे,बिनाकामा निमीत्त फिरणे याकारणामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आसल्याचे निदर्शनास येत आहे.ग्रामिणभागातील सार्वजनिक ढिकाणे, मुख्य बाजारपेठेत व इतर ठिकाणी सामाजिक अतंराचा फज्जा उडत असल्याचे दिसुन येत आहे. कोरोना मुक्त गाव व परिसर करण्यासाठी सर्व नागरीकांनी स्वताहुन शासनाने दिलेल्या सर्व नियमाचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
Leave a comment