औरंगाबाद । वार्ताहर
धडाडीचे संभाजीनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश हिवाळे यांच्या पुढाकाराने व त्यांच्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोफत औषधी वाटप केली. सचिन भाऊ रुपवते व राहुल काकडे यांच्या प्रयत्नामुळे औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद शहर पोलीस आणि अरुनिमा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज संजयनगर गल्ली नंबर 1 ते 21 व लायन्स क्लब कॉलनी रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथे आज कोरोना विषाणू पासुन रक्षण करणारे होमिओपॅथीक औषध आर्सेनिक अल्बम 30 औषधाचे मोफत वितरण करण्यात आले. औषधी वितरित करतांना पवन हिवराळे, राहूल खिल्लारे, सुभाष शिंदे, अंकुश हिवाळे, विजय साळवे, रवी म्हस्के, अमोल साळवे, महेंद्र थोरात, निखिल जाधव, संजयनगर मित्र परिवार त्यांच्या या बहुमूल्य सामाजिक कार्याबद्दल अभिनंदन होत आहे.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment