औरंगाबाद । वार्ताहर
दिल्ली पब्लिक स्कूल, औरंगाबादचा 2019-20 या वर्षी उइडए ने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल लागला. ही या शाळेची पहिलीच बॅच होती. मुलांनी स्वत:ला शंभर टक्के सिद्ध कले. आणि शाळेचे प्राचार्य श्रीयुत राजेश पाटील यांनी नवनविन योजना राबवत मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
33 विद्यार्थ्यांमधून 9 विद्यार्थ्यांना 95 टक्के, 16 विद्यार्थ्यांना 90 टक्के मिळले. 31 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळाले व 32 विद्यार्थी पहिल्या श्रेणीत पास झाले. त्यामध्ये अमृता स्वामिनाथन 98 टक्के, पुनीत साहुजी 97.4 टक्के, तनिष्का गर्भे 96.6 टक्के, चेरी छल्लानी 96.2 टक्के, गोपिका नायर 95.4 टक्के, पलाश साहुजी 95.2 टक्के, संभव संचेती 95 टक्के, अन्विक्षा जोहरी 94.8 टक्के, जय गटागट 93.8 टक्के, सिद्धी रुणवाल 93.6 टक्के, रिषभ कुमार 91.4 टक्के, वैभव पांडे 91.2 टक्के, आकाश जैस्वाल 91.2 टक्के, यशवर्धन काळे 90.8 टक्के गुण मिळवून शाळेचा गौरव वाढविला. पुनीत साहुजी याला गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले आणि संस्कृती येवले हिला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. मुलांनी मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे मुलांचे व शिक्षकांचे शाळेचे प्रोवाईस चेअरमन श्रीयुत सुभाषजी नाहर, श्रीयुत अतुलजी कोठारी, श्रीयुत गौतमजी संचेती, श्रीयुत राजेशजी पाटणी, श्रीयुत राजेशजी लोढा, श्रीयुत शिरीशजी खंडारे, प्राचार्य श्रीयुत राजेश पाटील, डायरेक्टर निशा सहानी, पर्यवेक्षक शिखा श्रीवास्तवा यांनी कौतुक केले व पुढील यशासाठी खूप शुभेच्छा दिल्या.
Leave a comment