बोरगाव बाजार ।  वार्ताहर

सिल्लोड कन्नड रस्त्यावर पुढे डांबरीकरण मागे खड्डेच खड्डे संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर डांबर टाकले की शासनाला चुना लावला, या कामाकडे स्थानिक -पुढार्‍याचे व संबधीत विभागाचे दुर्लक्ष.

कन्नड ते सिल्लोड या रस्त्याच्या रूंदीकरण व मजबुतीकरणाचे काम मागील एक ते दीड वर्षांपासुन युध्दपातळीवर दिवस-राञ सबंधीत ठेकेदाराकडुन करण्यात येत आहे,यातील सावखेडा ते सिल्लोड या रोडवर मागील दोन महीन्यापासुन रूंदीकरण व मजबुतीकरणाचे काम संपल्यानंतर डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे.कन्नड-सिल्लोड या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर सिल्लोड,कन्नड  चाळीसगाव,धुळे,या मार्गे गुजरात,मध्यप्रदेश ला जाण्यासाठी या रस्त्याचा मोठा फायदा जड व लहान वाहनधारकांना होणार असुन अवजड वाहनांची या रस्त्याने मोठी वर्दळ असणार आहे,सदरील रोडचे काम एक ते दीड वर्षांपासुन सुरू असुन या काळात वाहनधारकांना उन्हाळ्यात धुळीचा तर पावसाळ्यात चिखलात सामना करत वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागलेली (लागत) आहे, मागील दोन महिन्यापासून सिल्लोड ते भराडी या रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरणाचे काम थोड्या फार प्रमाणात बाकी असुन डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. हा रस्ता जरी नवीनच बनत असला तरी डांबरचे काम जसजसे पुढे पुर्ण  होत आहे तसतसे पाठीमागे मोठ मोठे खड्डे पडण्यास व रोड दबण्यास सुरुवात झालेली आहे,भराडी ते कन्नड या रस्त्यावर सुद्धा खड्डे पडण्यास व रोड दबुन उखडण्यास सुरुवात झालेली आहे,सिल्लोड-कन्नडहा  रस्ता ठिकठिकाणी दबुन डांबर उखडण्यास सुरूवात झाली आहे,व एक ते दोन महिन्यांच्या आतच डांबरी रस्त्यावर खड्डे पडले कसे?नवीनच दबाई झालेला रस्ता दबला कसा?संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर डांबर टाकला की शासनाला चुना लावला असा प्रश्न नागरिकांना व वाहनधारकांना पडला आहे, सिल्लोड व कन्नडकडे जातांना अशाच प्रकारे रस्ता उखडलेला असुन सदरील उखडलेल्या रस्त्याची संबंधित विभागाकडून चौकशी होऊन काही कारवाई होईल का? सदरील रस्ता हा रहदारीचा असुन स्थानिक पदाधिकार्‍यांकडुन कुठलीही तक्रार आजपर्यंत का करण्यात आलेली नाही,या रस्त्याचे काम पुर्ण होऊन खराब झाल्यावर आवाज उठवण्या पेक्षा आताच स्थानिक नेतेमंडळींनी सदरील रोडच्या बोगस कामाविषयी आवाज उठवावा,अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडुन होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.