पाचोड । वार्ताहर
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाला आहे ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या रुग्णाने झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पाचोड ता.पैठण येथे घरोघरी जाऊन कुटुंबाचे कोविड- 19 तपासणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहे.
यामुळे मागील दोन ते तीन दिवसापासून पाचोडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांच्या आदेशावरून गटविकास अधिकारी अंबादास गायके गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पुदाट यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख बळीराम भुमरे यांच्या नियंत्रणाखाली पर्यवेक्षक राजाराम धांडे, राजकुमार भुमरे व उत्तम ठाकरे यांच्यासह 32 शिक्षक पाचोडमध्ये संध्या घरोघर जाऊन कोविंड-19 तपासणी करत आहे. याप्रसंगी पाचोड गावचे सरपंच मनीषा पवन तारे,उपसरपंच राजूनाना भुमरे,उपसभापती कृष्णा भुमरे व ग्रामविकास अधिकारी श्रीकृष्ण कांबळे हे देखील उपस्थिती होते.
Leave a comment