अजिंठा । वार्ताहर
येथील 25 बेड च्या कोविड सेंटर ला भाजप प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश बनकर, सिल्लोड तालुका अद्यक्ष ज्ञानेशवर मोठे यांनी रविवारी भेट दिली होती. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज डोंगलीकर व कोविडच्या रुग्णांशी त्यांच्या अडचणी व समस्यावर चर्चा केली होती. त्यात प्रामुख्याने इन्व्हेंटर व ऑक्सिजन मशीन ची समस्या सांगितली होती.
यावेळी तातडीने भाजप चिटणीस इद्रिस मुलतानी यांनी ही बाब केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कानावर घातली. लगेच दुसर्या दिवशी सोमवारी एसडीएम ब्रिजेश पाटील यांना जिल्हाधिकर्यांचे आदेश येताच त्यांनी तातडीने ऑक्सिजन मीटर पाइंट वाल्याला अजिंठा कोविड सेंटरला पाठविले तसेच एका इन्व्हेंटर दुरुस्ती वाल्याला सांगून अजिंठा कोविड सेंटरची दोन्ही समस्या निकाली काढल्या. यामुळे अजिंठा कोविड सेंटर मद्ये उपचार घेणार्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रतिक्रिया.. दोन्ही समस्या सोडवल्या... सदर कोविड सेंटर ला आम्ही रविवारी भेट दिली होती. त्यात प्रामुख्याने दोन महत्वाचे एक इन्व्हेंटर व ऑक्सिजन मीटर ची समस्या समोर आली. मी ताबडतोब केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना सांगितले. त्यांनी तातडीने जिल्हाधिकार्यांना आदेश देत वरील समस्या एसडीएम साहेबांनी सोडविले. इद्रिस मुलतानी ...प्रदेश चिटणीस, भाजप
Leave a comment