बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगाव वाडीतील होम क्वाँरन्टईन केलेल्या रुग्णाच्या परिवारातील 12 जणापैकी पाच जणाची तब्येत अचानक बिघडल्याने व आरोग्य विभागाकडुन वेळेवर अँम्बुलन्स उपलब्ध होऊ नशकल्यामुळे रुग्णानी स्वताच्या रिक्षातुन सिल्लोड येथे जाऊन 5 जणानी स्बँव दिले,व बाकी 7 जणाना स्वँब घेण्याचे साहीत्य (निडल) संपल्यामुळे गावी वापस पाठविले.
शहरी व ग्रामिण भागातही कोरोनाने पाय पसरायला सुरूवात केली,बोरगांव वाडी येथे दिनांक 12 रविवारला 1 कोरोना बाधीत रूग्ण आढळुन आला होता,व परिसरात एकच खळबळ उडाली होती, तर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने हा सर्व परिसर कंटेंमेंट झोन जाहीर करून सील केला होता,व या बाधीत रुग्णाच्या संपर्कात असलेल्या 16 जणाना घरात होमक्वाँरन्टईन करण्यात आले होते,व यातील एक लहान मुलगी व तीन वयस्कर असे चार जणाना सोमवारी दिनांक 13 रोजी श्वसनाचा व ताप,डोकेदुखीचा ञास होत होता,असे असता आम्हाला औरगांबाद येथे उपचार करण्यासाठी जाऊ द्या असे सदरिल रुग्णाचे म्हणे होते परतु होमक्वाँरन्टाईन असल्यामुळे यांना ,यावेळी तालुका वैद्याकिय आधिकारी योगेश राठोड यांच्या आरोग्य विभागातील इतर कर्मचार्यांनी दिनांक 13 वार सोमवारला साधारण 3 ते 4 वाजेच्या दरम्यान क्वाँसिंलीगी पध्दतीने उपचार करुन प्राथमिक उपचार केला व आज राञी घरीच थांबण्या सल्ला दिला, व सकाळी अकरा वाजेला अँम्बुलन्स पाठवुन सर्वाना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये उपचारसाठी नेऊन व स्वँब घेऊन रिपोर्ट आल्या नतंर पुढील उपचार करण्यात येईल असे सांगुन तिथुन निघुन गेले,व दिनांक 14 रोज मंगळवारला दुपारी 1 वाजे पर्तय अँम्बुलन्सची वाट बघत या होमक्वारँन्टाईन केल्या रुग्णामधील काहीना ताप,डोकेदुखी,श्वसनाचा जास्त ञास होत असलेल्या 12 रुग्णानी स्वताच्या रिक्षातुन प्रवास करुन सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये उपचार घेण्यास सुरूवात केली व 12 पैकी 5 रुग्णाचे सिल्लोड योथे स्वँब घेतले व स्वँब घेण्याचे साहीत्या संपले होते म्हणुन बोरगाव वाडी येथे वापस पाठवण्यात आले,बुधवारी खाजगी वाहना द्वारे अजिंठा येथील कोविड सेंन्टरला पाठवणार आहे यावेळी असे कळाले, यावेळी या रुग्णाना सिल्लोड पाठविण्या साठी पोलीस कर्मचार्या व्यतिरिक्त कोणीही दुसरे कर्मचारी हजर नव्हते हे विशेष म्हणावे लागेल,या दरम्यान बोरगाव बाजार बिट जमादार मुस्ताक शेख व पोलिस कर्मचारी संजय पवार हे बोरगांव वाडीसह बोरगांव बाजार व बीट अंतर्गत येणार्या गावात गस्त घालुन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे,
याविषयी तालुका वैद्यकिय आधिकारी योगेश राठोड यांना भ्रमणध्वनी वरून विचीरले असता आपल्या तालुक्यात अनेक ढिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत आसल्यामुळे अँम्बुलन्स वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही थोडेसमजुन घ्या व जशी काही वाहनाची अँम्बुलन्सचा व्यवस्था होताच पाठवतो नाही तुमच्याकडुन गावातुन एखाद्या वाहनाची व्यवस्था झाली तर या रुग्णाना पाठवुन द्या असे म्हणत काँल कट केला, ग्रामसेवक शिवाजी गायके यांना याविषया विचारले असता,रुग्णाना नेणे आणने ते आपले काम नाही अँम्बुलन्स उपलब्ध करणे हे आरोग्य विभागाचे काम आहे माझे नाही,तरी सुध्दाआम्ही रिक्षाच्या दोन फेर्याद्वारे 12 जणाना सिल्लोड नेले होते पण पाच जणाचे स्वँब घेतले,स्वँब घेण्यासाठी लागणार्या निडल(सुय्या) संपल्यामुळे बाकीचे 7 जणाना गावी परत पाठविले आहे व त्या सकाळी प्राव्हेट गाडीने अजिंठा कोविड सेन्टरला पाठवायचे आहे,असे गायके यांनी सांगितले
Leave a comment