यशोदा सीड्स व न्यू प्रसाद अग्रो ट्रेडर्स वर गुन्हा
पाचोड । विजय चिडे
विक्रेत्याच्या संगनमताने शेतकर्यांना कमी उगवण शक्तीच्या तसेच उगवन शक्ती नसलेल्या निकृष्ट बियाण्यांचा पुरवठा तथा विक्री करून स्वतःला फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सोयाबीनचे बोगस बियाणे संगणमत करून शेतकर्यांना फसवणूक प्रकरणी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी उगवन न झाल्याने व शेतकर्यांची कंपनीकडून फसवणूक झाल्याने सू-मोटो याचिका दाखल करून सुमोटो सदर याचिकेमध्ये अशा बोगस बियाणे बियाणे उत्पादन व विक्री करणार्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत या निर्देशांक आधारे सोयाबीन उत्पादन करणारी कंपनी व कृषी सेवा केंद्रासह बोगस बियाणे विक्री करणार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर्षी मान्सूनने जोरदार सलामी दिल्याने खरीप हंगामाची सुरुवात शेतकर्याने आनंदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिसरामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती परंतु हे बियाणे बोगस निघाल्याने उगवलेच नसल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.यावर शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेत बोगस बियाणे तयार करणार्या कंपन्या आणि विकणार्यावर पैठण कृषी तालुका अधिकारी पैठण यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या या पार्श्वभूमीवर कृषी अधिकारी विकास पाटील यांनी पाहणी केली असता सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर त्याची उगवण 70 टक्के होणे कायद्याच्या तरतुदीनुसार अनिवार्य आहे या शेतकर्याच्या शेतामध्ये पेरणी केलेल्या उपयुक्त तक्त्यानुसार नमूद केलेल्या बियाण्यांची उगवण कायद्यात ठरवून दिलेल्या मापदंडाप्रमाणे झाली नसल्याने सदर बियाणे सदोष आहे हे आढळून आले यामध्ये शेतकरी विजय आण्णासाहेब गव्हाणे व सदाशिव केशवराव गव्हाने रा.दादेगाव शेती कुतुबखेडा शिवार गट.न.30/2 यांचे तालुका पैठण यांचे बियाण्याची पेरणी केल्यावर उगवण न झाल्याने या शेतकर्यांचे नुकसान झाल्याचे आढळून आल्याने बियाणे उत्पादित कंपनीने उत्पादित, वितरीत व विक्री केलेल्या बियाणाची गुणवत्ता निकृष्ट असून कंपनीने कृषी सेवा केंद्रा चालकाची संगणमत करून निकृष्ट दर्जाचे बियाणे विकून बियाणे कायदा 1966 च्या कलम 6(ए).व 7(बी.),बियाने नियम,1968मधील 38, च्या नियमानुसार उल्लंघन खंड च्या खंड अठरा चे उल्लंघन अनुसार कमी उगवणशक्ती चे बियाणे उत्पादन व वितरण पुरवठा विक्री करणे हा अपराध केल्याचे आढळून आल्याने कंपनी परवानाधारक प्रदीप माणिकराव पाटील वय (38) वर्ष, यशोदा हायब्रीड प्रा.लि.248 लक्ष्मी टॉकीज जवळ हिंगणघाट जिल्हा वर्धा बियाणे उत्पादक कंपनी बोगस बियाणे विक्रेता दुकानदार न्यू प्रसाद ऍग्रो परवानाधारक दुकानदार भाऊसाहेब अंकुशराव नरवडे वय (40) यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल आला आहे याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल यांच्या येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करत आहे.
Leave a comment