सिल्लोड । वार्ताहर
संपूर्ण देशात कोरोना सारखी महामारीचा मुद्दा समोर ठेऊन केंद्र सरकारने लॉकडाऊन 23 मार्च 2020 पासून आज पर्यंत लागू केल्याने तसेच संचारबंदी मूळे नागरीकांच्या फार मोठा आर्थिक नुकसान झाल्याने उत्पन्नात घट झाली आहेत.
म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी च्या काळातील घरगुती विज बील माफ करा अशी मागणी सिल्लोड शहर व तालुका काँग्रेस पक्ष तर्फे एका शिष्टमंडळाने श्री अधिकार सिल्लोड तालुका उपविभागीय अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या मार्फत ऊर्जा मंत्री नितीन राऊत याकडे केली आहे. या शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष भास्कर घायवट पाटील,, सिल्लोड शहर अध्यक्ष शेख फेरोज अकबर, शांतीलाल अग्रवाल, केसर आजाद, योगेश राऊत, , इरफान पठाण, मजहर पटेल,अल्पसंख्याक काँग्रेस चे शहर अध्यक्ष शेख फरमान कूरेशी, मोबीनखॉ पठाण, मंगेश कळम, कृष्णा जाधव आदि उपस्थित होते.
Leave a comment