फर्दापूरात कोरोनाचा शिरकाव;एका डॉक्टरसह सहा जण कोरोना पॉझिटीव्ह
फर्दापूर । वार्ताहर
मागील चार महीन्यापासून कोरोनामुक्त गाव म्हणून वाटचाल करीत असलेल्या फर्दापूर (ता.सोयगाव) येथे अखेर कोरोना ने शिरकाव केला असून दि.14 मंगळवार रोजी येथील एका डॉक्टरसह एकूण सहा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावात खळबळ उडून गेली आहे बाधित रुग्ण राहत असलेला परीसर तहसीलदार प्रविण पांडे गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे एपीआय प्रतापसिंह बहूरे तालूका आरोग्य अधिकारी श्रीनिवास सोनवणे ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे तलाठी सुरज गिरी उपसरपंच शेख सत्तार तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तार शेख,सुरेश शेळके,गणेश वेल्हाळकर आदींच्या पथकाने तातडीने सिल करुन संपूर्ण परीसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे,फर्दापूर गाव आठ दिवसासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फर्दापूर येथील 49 वर्षीय पुरुषावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात निमोनियाचे उपचार करण्यात येत असतांना सदरील खाजगी रुग्णालयाने तो 49 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह असल्याची शक्यता वर्तविल्याने तालूका वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास सोनवणे डॉ.केतन काळे यांच्या पथकाने तातडीने दि.13 सोमवारी संशयीत रुग्णा सहीत त्याच्या कुटूंबातील सात व संशयीताच्या संपर्कातील दोन खाजगी डॉक्टर असे एकूण 9 स्वॅब चे नमूने कोव्हीड 19 चाचणी साठी घेऊन सर्वाना होम कोरोंटाइन केले होते दरम्यान दि.14 मंगळवारी सकाळी हा चाचणी अहवाल प्राप्त झाला असून 9 पैकी 6 जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे या अवहालात निष्पन्न झाले आहे यात एकाच कुटूंबातील पाच सदस्यांन सह त्यांच्या संपर्कातील एका खाजगी डॉक्टरचा समावेश आहे सदरील माहिती प्राप्त होताच फर्दापूर परीसरात एकच खळबळ उडून गेली आहे. दरम्यान आरोग्य विभागाने सर्व सहा कोरोना बाधितांना वैद्यकीय उपचारासाठी कोव्हीड उपचार केंद्र जरंडी येथे रवाना करुन बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांची फर्दापूर येथील जि.प शाळेतील आरोग्य केंद्रात रॅपिड टेस्ट घेऊन सर्वांना 14 दिवसासाठी होम कोरोंटाइन केले आहे.गावात आरोग्य,महसुल व पंचायत विभागाचे पथक तळ ठोकून असून संपूर्ण गावात आरोग्य तपासणी व निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
फर्दापूरात आठ दिवस कडकडीत लॉक डाऊन
फर्दापूर येथे एकाच दिवसात सहा जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त होताच हादरून गेलेल्या फर्दापूरकरांनी ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे तलाठी सुरज गिरी उपसरपंच शेख सत्तार पो.पा शिवाजी बावस्कर सदस्य विलास वराडे,रविंद्र बावस्कर,फिरोज पठाण,भीमराव बोराडे आदींच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन आठ दिवस फर्दापूर गाव शंभर टक्के लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी वैद्यकीय सेवा 24 तास तर किराणा दुकानांना केवळ सकाळी सहा ते दहा यावेळेत व्यवसायाची मुभा असेल या व्यतिरिक्त मास्क वापरणे बंधनकारक असून मास्क न लावणार्यास व नियमांची पायमल्ली करणार्यास दंड ठोठावण्यात येणार आहे.
Leave a comment