बोरगांव बाजार । वार्ताहर
सावखेडा ता.सिल्लोड येथील शेतकरी पुंडलिक विठ्ठल गोंगे यांच्या गट क्रं.19 मधील शेतातील दहा ते पंधरा गुठ्ठे मिरचीचे झाडे उपटुन फेकली,आरोपीवर कार्यवाही करावी अशी मागणी लेखी अर्जाद्वारे तहसिल कार्यालय सिल्लोड यांच्याकडे केली आहे.
सावखेडा ता.सिल्लोड येथील शेतकरी पुडलिक विठ्ठल गोंगे यांच्या गट क्रं.19 मधील दहा ते पंधरा गुठ्ठे मिरचीची लागवड केली आहे,व गावातील शरद गणपत भोजणे,कचरू गणपत भोजणे,भारत गणपत भोजणे या तीन भावडांचे ट्रक्टर मागील महीन्यात महसुल विभागाने पकडले होते व दंड आकारुन सोडुन दिले होते,याचाच राग धरुन दिनांक 8 जुलैला राञी 10 ते 11 वाजे दरम्यान दहा ते पंधरा गुठ्ठे काढणीस आलेले मिरची चे झाडे उपटुन फेकले,व पुंडलिक गोंगे यांना शरद व त्याच्या दोन भावानी धमकी दिली कि तुम्ही आमच्या विरुध्दात पोलिसांत केस नोद केली तर आम्ही आत्महत्या करु व तुमच्या नावे चिट्टी लिहुन ठेवू, तरी संबधीत महसुल विभागाने माझे उपटुन नुकसान करुन फेकलेल्या मिरचीच्या पिकाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी,व या मध्ये दोषी असलेल्या भोजणे बंधुवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी तहसिल कार्यालय व ग्रामिण पोलीस स्टेशन सिल्लोडला दिलेल्या लेखी अर्जाद्वारे केली आहे.
Leave a comment