फर्दापूर । वार्ताहर

सोयगाव तालुका केंद्रीय पत्रकार संघाची कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष सचिन बोंबले यांचे नेतृत्व मान्य करुन बिनविरोध नियुक्ती पत्र प्रदान करुन नुकतीच करण्यात आली.या निवडीचे सोयगाव तालुक्यासह जिल्ह्याभरातुन स्वागत होत आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पदी विजय पगारे तर उपाध्यक्ष पदी सागर भुजबळ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. राज्यभरात केंद्रीय पत्रकार संघाने विविध जिल्हात जाळे विनले असुन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठीच संघटना भक्कम  साथ देत असल्याचे सर्वत्र निर्दशनास येत आहे.जिल्ह्यात व तालुक्यातील गावातील शेवटच्या घटकातील सुख सोई पासुन वंचीत पत्रकारांनी निशुल्क संघटनेत सामावू घेण्याचे काम मा.संदीप कसालकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.याचाच एक भाग औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन बोंबले यांनी जिल्हा भरात नव युवक जोशीले होतकरु पत्रकारांची अजोड फळी तयार केली असुन कें.प.संघ वाढीसाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

मा.संदिप कसालकर यांच्या आदेशावरुन व मा.कमलेश गायकवाड यांच्या शिफारसीनुसार जिल्हा अध्यक्ष मा.सचिन बोंबले यांनी तालुक्यातील पदाधिकारी निवडीचे नियुक्ती पत्र दिले ते पुढील प्रमाणे केंद्रीय पत्रकार संघ महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सोयगाव तालुका कार्यकारिणी अशी अध्यक्ष : विजय बन्सी पगारे,उपाध्यक्ष : सागर वसंत भुजबळ ,  भावराव कचरु  मोरे , गोकुळसिंग सुकदेव चव्हाण (राजपूत),संपर्क प्रमुख : विजय रमेशराव काळे(पाटील),कार्याध्यक्ष : विकास लक्षमन पाटील,कोषाध्यक्ष : सुनिल नारायण माकोडे,सहकोषाध्यक्ष : सचिन लालसिंग राठोड,संघटक:समाधान रामदास घुले,सहसंघटक : अन्यानसिंग बाबुराव चव्हाण,सचिव : विजय गोविंदा चौधरी,सहसचिव : सुनिल येवतराव चव्हाण,संपर्कप्रमुख :शे.सुलेमानउस्मान,सहसंपर्कप्रमुख : शंकर रमेश खराटे,समन्वयक : शरद पंडीत दामोधर,जनसंपर्क अधिकारी : विनोद सुभाष कोते,प्रवक्ता : सागर विजय बिरारे,संरक्षक : अनिल पांडुरंग रावळकर,सोयगाव तालुका प्रभारी: मुस्ताक्षा शहा फकीर,तालुका कार्यकारणी सदस्य सौ.मनीषाताई योगेश बोखारे,यासिन चाँद बेग, निलेश मधुकर पाटील या निवडीचे सोयगाव तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्याभरातुन स्वागत करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.