औरंगाबाद । वार्ताहर
ब्राह्मण समाजातील उपवरांसाठी ब्रह्मवृंद वैभव वधुवर सूचक मंडळातर्फे वधू-वरांच्या राज्यस्तरीय पुस्तिकेसाठी नाव नोंदणी सुरू असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. समाजात विवाहाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोना च्या पार्श्वभूमीवर मेळावे घेणे शक्य नाही. यामुळे या काळात उपवर वधू वरांची अडचण होऊ नये म्हणून उपवर वधू वरांची राज्यस्तरीय नाव नोंदणी सुरू आहे.
ही नोंदणी 25 ऑगस्ट पर्यंत चालणार असून 1 सप्टेंबर 2020 रोजी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे या मध्ये घटस्फोटीत, विधवा, विधुर ,सापत्य, विनापत्य,अपंग प्रौढ वधूवर ही भाग घेऊशकता . या संधीच समाजबांधव वधू-वरांनी लाभ घ्यावा असे आवाहन दत्तात्रय पिंपळे,अश्विनी लोटांगणे,रामचंद्र अंधारकर ,देवीदास जोशी,रवी कुलकर्णी ,पद्माकर नाईक यानी केले आहे.नाव नोद्णी साठी 9403922862 यावर संपर्क साधावा.
Leave a comment