रहिमाबाद । वार्ताहर
रहिमाबाद कडे जाणार्या डोंगरगाव रस्त्यावरील पुलाचे बोगस काम केल्यामुळे दरवर्षीच भगदाड पडून जशास तसे होते. सिल्लोड ते रहिमाबाद हा डोंगरगाव मार्गे रस्ता असून गावाजवळील पुलाला दरवर्षीच मोठे मोठे खड्डे पडतात व ते परत गुतेदारामार्फत काम करून थातूरमातूर काम करून बुजविले जातात.
हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या असून याचे उद्घाटन सहा महिन्यांपूर्वी मंत्र्याच्या हस्ते करण्यात आलेले आहे . आता परत पहिल्याच पावसात ह्या पुलावरील झालेले काम पूर्णपणे वाहून गेले असून त्या मुळे दोन मोठे भगदाड ह्या पुलावर पडले पहावयास मिळत आहे . या दहा किलोमीटर रस्त्याच्या कामासोबत ह्या पुलाचे मजबुतीकरण सुद्धा करणे गरजेचे असून या मुळे प्रवासी वाहतून सुरळीत होऊन अपघात होणार नाही.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment