35 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त
फर्दापूर । वार्ताहर
अवैधरीत्या गुटखा वाहतूक करतांना पोलिसांनी 5 हजार पाचशे रुपये किमंतीच्या गुटख्याच्या 50 पुड्यांन सह दुचाकी असा एकूण 35 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई एपीआय प्रतापसिंह बहूरे यांच्या मार्गदर्शना वरुन पो.कॉ नारायण खोडे पो.ना अण्णा गवळी यांच्या पथकाने वरखेडीतांडा ते वाकोद मार्गावर दि.7 मंगळवार रोजी केली आहे.
या बाबत पोलिस सुत्रांन कडून प्राप्त अधिकृत वृत्त असे की दि.7 मंगळवार रोजी वरखेडीतांडा ते वाकोद मार्गावरुन अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून फर्दापूर पोलिसांना प्राप्त झाली होती या माहीतीच्या आधारे पो.कॉ नारायण खोडे अण्णा गवळी यांनी वरखेडीतांडा वाकोद मार्गावरून संशयास्पद रित्या दुचाकी (क्र.एमएच 19 डिसी 4624) वरुन जात असलेल्या दुचाकी स्वाराला थांबवून चौकशी केली असता त्याच्या कडे विमल सुगंधीत तंबाखूचे 25 व विमल सुगंधीत सुपारीचे 25 असे 5 हजार पाचशे रुपये किमंतीचे एकूण 50 पुडे मिळून आले दरम्यान पोलिसांनी अवैधरीत्या गुटखा वाहतूक प्रकरणी कारवाई करुन आरोपी कडून 5 हजार पाचशे रुपयांचा गुटखा व 30 हजार रुपये किमंतीची दुचाकी असा एकूण 35 हजार पाचशे रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी बाबु अब्दुल तडवी (रा.वाकोद ता जामनेर) विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Leave a comment