फर्दापूर । वार्ताहर
पळसखेडा ता.सोयगाव येेथील 65वर्षीय कोरोना पाँझिटिव्ह रुग्णाच्या घरातील 26 वर्षीय महिला व 3 वर्षाचा बालक कोरोना पाँझिटिव्ह असल्याचा अहवाल दि.7 मंगळवारी प्राप्त झाल्याने पळसखेडा गावातील कोरोना रूग्णांची संख्या तीन वर गेली आहे.
पळसखेडा येथे 65 वर्षीय पुरुष काही दिवसा पासुन आजारी असल्याने त्याला उपचारासाठी दि.2.रोजी जळगाव येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले होते तेथे त्याची कोरोना ची तापसनी केली असता दि.5 गुरुवार रोजी कोरोना पाँझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने तालुक्यात एक च खळबळ ऊडाली होती अहवाल येताच सोयगाव चे आरोग्य पथक गावात दाखल होऊन पाँझिटिव्ह पूरूषा च्या संपर्कातील लोकांची तपासणी करुन 9 जनांचा स्वाँब घेऊन तपासणी साठी पाठवण्यात आला होता व 12 जनांना कँरनटाई केले होते यातील आज बाधीत पुरुषा च्या घरातील 26 वर्षीय महिला व 3 वर्षा चा बालक पाँझिटिव्ह असल्या चा अहवाल आला असुन 7 जण निगेटिव्ह आले आहे या मुळे पळसखेडा गावातील कोरोना रूग्णांची संख्या 3 वर पोहच ली आहे आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारी म्हणून गावातील 2500 लोकांची तपासणी करण्यात आली आहे.खबरदारी म्हणून गावात आरोग्य विभागा चे कर्मचारी तैनात आहे .
Leave a comment