सोयगाव । वार्ताहर
एकेकाळी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यावर नेतृत्व करणार्या सोयगांववर आता दिल्ली नेतृत्वाची नजर असून त्यामुळे सोयगावात काँग्रेस पक्षाचे नव्याने रोपटे लावण्याचे काम करण्यासाठी मी सोयगावात आलो आहे.सोयगावातील मजूर,शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष मजबुतीने उभा आहे.असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्यान काळे यांनी मंगळवारी इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी निषेधार्थ ते बोलत होते.
तालुका काँग्रेस कमेटी आणि जिल्हा शहर कमेटीच्या वतीने केंद्र शासनाच्या निषेधार्थ सोयगावला काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात येवून जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्यान काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार प्रवीण पांडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी माजी आमदार कल्यान काळे यांनी सांगितले कि,सोयगावात जावून कष्टकरी,शेतमजूर,आणि शेतकर्यांच्या समस्या जाणून घ्या असे स्पष्ट आदेश पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी दिल्याने मी सोयगावात आलो आहे त्यामुळे आता सोयगावकरांनो तुमच्यावर आता दिल्लीच्या नेतृत्वाची नजर आहे.त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कम उभे राहा असे आवाहन त्यांनी केले.दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे कि,देशभर इंधन दरवाढ करण्यात आलेली आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळे बंदीमुळे जनता एकीकडे त्रस्त असतांना इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीमुळे मोठी चिंता वाढली आहे.त्यामुळे या निषेधार्थ केंद्र शासनाच्या विरोधात सोयगाव तहसील कार्यालयावर तासभर निदर्शने करून मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी सोयगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव,किरण पाटील डोणगावकर,रामू काका शेळके,आनंदा पाटील,लाखुसिंग नाईक,उस्मान पठान,शेख रवूफ,विश्वास नाईक,बाळू खंडाळे,हरीश राठोड,हेमराज राठोड,सुनील शिंदे,राजू लव्हाळे,महिला काँग्रेस कमेटीच्या सीमा लव्हाळे,आशा लोखंडे,दुर्गा तांगडे,सुनिता महाकाळ,रईसा पठाण,विमल सूरवाले,जाकीया शेख,रिजवाना शेख आदींची उपस्थिती होती.
Leave a comment