विहामाडंवा । वार्ताहर
कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने गुरुपौर्णिमा हा गुरुप्रणीत मार्गातील महत्वाचा असलेला उत्सव केंद्र व मंदीरे बंद असल्याने प्रत्येक सेवकर्याने आपापल्या घरी दि.5 रविवारी साजरा केला. यानिमित्ताने श्रीस्वामी समर्थ महाराजांचे मुर्तीवर अभिषेक करुन पुजन करण्यात येऊन महाराजांना गुरुपद स्विकारण्याची भक्तांनी विनंती केली.
प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीसमर्थ सेवा केंद्रातर्फे रक्तदानाचा उपक्रम घेण्यात येत असतो. यावर्षी कोरोनाच्या विषाणुने थैमाण घातल्याने लॉकडाऊनमुळे केंद्र बंद असल्याने रक्तदानाचे आयोजन यशवंतनगर/रामनगर साप्ताहिक केंद्र मारोती मंदीर येथे करण्यात आले होते. दत्ताजी भाले रक्तपेढी, श्रीस्वामी समर्थ सेवेकरी व रोटरी क्लब पैठण, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबीरात फिजीकल डिस्टंसींग व सॅनीटायझेशनचे नियम पाळत 52 भक्तांनी गुरुदक्षिणेच्या स्वरुपात रक्तदान केले. शिबीराचे उद्घाटन तहसीलदार चंद्रकात शेळके, माजी प्राचार्य रामदास वल्ले, सामाजिक कार्यकर्ते राम आहुजा, फादर व्हॅरेलीयन फर्नांडिस, गणेश बावकर यांचे हस्ते करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ताजी भाले रक्तपेढीचे निवृत्ती मोरे, डॉ. निवृत्ती वानोळे, गजानन वाघ, राधा पठाडे, संतोष खरे, उदय पाटील, तीखे,कोष्टी, आमलेकर, कोलते,बोबडे सर,टेकाळे, सेवणकर,धूत,आदींनी परिश्रम घेतले.
Leave a comment