आठवडी बाजार रद्द ;ग्रा.पं प्रशासनाचा निर्णय
फर्दापूर । वार्ताहर
कोव्हीड 19 विषाणू संसर्गाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर फर्दापूर ग्रामपंचायत कार्यालयात दि.6 सोमवार रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फर्दापूर गावात पुढील तीन दिवस कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यू पालन करीत पुढील आदेशा पर्यंत येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीस सभापती उस्मान खॉ पठाण ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरूळे तलाठी सुरज गिरी उपसरपंच शेख सत्तार सदस्य विलास वराडे,फिरोज पठाण,भीमराव बोराडे,सत्तार शाह,शेख इस्माईल पो.पा शिवाजी बावस्कर तंटामुक्ती अध्यक्ष शेख मुक्तार,नारायण कापसे,हर्षवर्धन जगताप,संतोष दामोदर शेख आसिफ आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे लोन झपाट्याने पसरत चालल्याचे दिसून येत असल्याने कोरोना संसर्गाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर फर्दापूर ग्रामपंचायत कार्यालयात दि.6 सोमवारी तातडीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दि.7 मंगळवार पासून पुढील तीन दिवस गावात वैद्यकीय सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्याचा व पुढील आदेशा पर्यंत येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी 7 ते 11 व सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत दोन सत्रात व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे दरम्यान गावात नागरीकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून विना मास्क फिरणार्याना दोन शे रुपये दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान बाहेर गावातील व्यापार्यांना पुढील तीन दिवस फर्दापूर गावात प्रवेश करण्याची बंदी करण्यात आली आहे.यावेळी पुढील तीन दिवस स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून ग्रा.पं प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान कोरोना दक्षता समितीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे,तलाठी सुरज गिरी,पोलिस पाटील शिवाजी बावस्कर उपसरपंच शेख सत्तार व ग्रा.पं पदाधिकार्यांनी केले आहे.
Leave a comment