शिवसेना-युवासेनेचा उपक्रम : सम्पूर्ण अजिंठा गावात राबविले निर्जंतुकीकरण मोहीम
सिल्लोड । वार्ताहर
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोणतीही भीती न बाळगता प्रशासनास माहिती द्यावी . कोरोना संशयित किंवा संपर्कातील लोकांनी पुढे येऊन स्वँब दिल्यास त्यांचा व त्यांच्या परिवाराचा धोका टळतो असे स्पष्ट करीत नियमांचे पालन केल्यास कोरोनाचे संक्रमण रोखता येते यासाठी ग्रामपंचायत, पोलीस, प्रशासकीय विभाग व जनतेने एकत्र येवून मास्क नियमित वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, स्वच्छता राखणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी अजिंठा येथे केले. गेल्या दोन दिवसात अजिंठा ता. सिल्लोड येथे 13 नवीन कोरोनाचे रुग्ण वाढले.त्याअनुषंगाने अजिंठा येथील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ना. अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने शिवसेना व युवा सेनेच्या वतीने संपूर्ण अजिंठा गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी हायपोक्लोराइड व धूर फवारणी करण्यात आली . सोमवार (दि.16) रोजी अजिंठा गावातील गांधी चौक भागात या उपक्रमाचे उद्घाटन ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले .याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना ना. अब्दुल सत्तार बोलत होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, युवा नेते अब्दुल समीर, तहसीलदार रामेश्वर गोरे , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर कांबळे , उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पं. स. सदस्य अली चाऊस , अजिंठा सरपंच दुर्गाबाई पवार , गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे ,नायब तहसीलदार विनोद करमनकर , तालुका आरोग्य अधिकारी रेखा भंडारी,शिवना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख जवेरीया, अजिंठा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. डोंगळीकर, डॉ. हाश्मी यांच्यासह डॉ. संजय जामकर , देविदास पाटील लोखंडे,शिवसेना जिल्हा उपप्रमुख रघुनाथ चव्हाण , शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल,तालुका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे, माजी पंचायत समिती सदस्य सय्यद नासेर हुसैन, पंजाबराव चव्हाण ,निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, माजी सरपंच अब्दुल अजिज, राजेश ढाकरे, लुकमान खान पठाण आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ना. अब्दुल सत्तार यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकार्यांकडून अजिंठा गावासह तालुक्यातील कोरोना विषाणू बाबत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी अजिंठा येथील कोविड सेंटर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली . याप्रसंगी उपस्थित पोलीस, विविध विभागाचे अधिकारी,डॉक्टर, नर्स व सफाई कर्मचार्यांनी सेवा देत असताना स्वतःची खबरदारी घ्यावी, रिक्त पदे भरण्यासाठी चा प्रस्ताव शासनास सादर करावा, रुग्णांची काळजी घ्यावी सोबतच ग्रामपंचायत व पोलिस विभागाने मास्क न वापरणारे तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश ना. अब्दुल सत्तार यांनी दिले. कोरोनाचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकार तुमच्या सोबत आहेत.रिक्त पदांच्या जागा लवकरात लवकर भरण्यात येईल .यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जीवाचे रान करीत आहेत . या काळात जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी केले.
Leave a comment