सिल्लोड । वार्ताहर
हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार (दि.1) रोजी कृषी विभागामार्फत एक जुलै ते सात जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह सिल्लोड तालुक्यात साजरा केला जात आहे. या सप्ताह निमित्त उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत मार्गदर्शक पुस्तिका बनवण्यात आली आहे.
या पुस्तिकेचे विमोचन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले , पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, युवानेते अब्दुल समीर, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी आदींची उपस्थिती होती.
Leave a comment