औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा शहरात कडक लॉकडाउन करावे,अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली.
शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक आहे. त्यामुळे सर्व जनतेचे हित लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, मनपा, पोलीस आदींनी संयुक्त बैठक घेऊन निर्णय घ्यावा. 10 ते 19 जुलै पुर्णपणे संचारबंदी व कडकडीत बंद केल्यास रुग्ण कमी होईल. नागरिकांना त्रास होऊ नये, याकरिता दोन दिवस अगोदर सूचना द्यावी. तसेच या माध्यमातून नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने या संकटाला सामोरे जाण्याचे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. या मागण्यांना मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन उचित करवाईचे आश्वासन दिले.
Leave a comment