औरंगाबाद । वार्ताहर
जुनाबाजार येथील मुख्य टपाल कार्यालयात एफएनपीओ युनियन औरंगाबाद विभागाचे विभागीय सचिव .डॉ.श्री.सुहास कडभणे व एफएनपीओ युनियन, औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष .श्री.संजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मा.श्री.सुनिल कोळी, प्रवर डाकपाल, प्रधान डाकघर,औरंगाबाद यांच्या हस्ते माझ्या कार्यालयीन डाक कर्मचारी बंधु आणि भगिनींना पॉकेट हँड सॅनीटाईजर हा एक मदतीचा हात म्हणुन याचे वाटप करण्यात आले. तसेच, हे वाटप औरंगाबाद प्रवर अधिक्षक डाक विभागीय कार्यालयाचे प्रवर अधिक्षक .श्री.राहुल बी.के.श्री.असदुल्लाह शेख (सहा.अधिक्षक कट), मा.श्री.ए.एफ.दांडगे (सहा.अधिक्षक), मा.श्री.ताठे (सहा.अधिक्षक) व औरंगाबाद विभागीय कार्यालय व औरंगाबाद प्रधान डाकघर येथील माझे सर्व कर्मचारीमित्र यांच्या उपस्थीतीत करण्यात आले. आजच्या या पॉकेट हँड सॅनीटाईजर वाटप कार्यक्रमासाठी संघटनेचे श्री.गजेंद्र तोटावाड (सहा.सचिव), श्री.एम.एम. दांडगे (सहा.सचिव), श्री.विक्रांत कुमार (सहा.सचिव), श्री.के.पी.गवळी, श्री.संजीत कुमार, रिषभ जाधव, अखिलेश कुमार, रवीचंद्र कुमार हे सर्व पदाधिकारी व तसेच, औरंगाबाद प्रधान डाकघर येथील सर्व डाक कर्मचारीबंधु आणि भगीनींचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी पॉकेट हँड सॅनीटाईजर हे आपल्या सर्वांना कसे उपयोगाचे व मदतीचे आहे आणि आपल्याला याचा वापर कशाप्रकारे करून घेता येईल, याची सविस्तरपणे माहिती ही औरंगाबाद प्रधान डाकघर येथील आपले सर्वांचे आदरणीय मा.श्री.सुनिल कोळी सर, प्रवर डाकपाल, औरंगाबाद यांनी या कोरोना महामारीला अनुसरून दिली. तसेच, या ’हँड सॅनीटाईजर’ चा लाभ घेत असताना कोरोना महामारीच्या रोगापासुन आपण सर्वप्रथम स्वत:ला आणि याचा प्रथमोपचार म्हणुन आपल्या भारतीय बांधवांना वाचवण्यासाठी आपण एक सुजाण भारतीय नागरिक म्हणुन मोलाची भुमिका पार पाडु शकतो व तसेच, स्वच्छता व आपल्या सुरक्षेसाठी सॅनिटायझरचे व फेसमास्क वापर जास्त प्रमाणात करावे या संकटकालीन परिस्थीतीत आपण आपल्या भारतीय टपाल कार्यालयास देखील असेच सहकार्य करावे असे मत व्यक्त पोस्टमास्तर सुनिल कोळी यानी केले आहे.
शेवटी डॉ सुहास कडभने यांनी सांगितले की, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच गर्दीच्या ठिकाणी जाने टाळावे आपल्या व आपल्या परिवाची काळजी घ्यावी कोरोना संकटात सर्वांनी शासनाला सहकार्य करावे
Leave a comment