औरंगाबाद । वार्ताहर
आमदार संजय शिरसाट यांच्या स्थानिक विकास निधीमधून सातारा परिसर येथील उत्कर्ष नगर या भागात ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. सातारा परिसरातील उत्कर्ष नगर या भागात ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे आज भूमिपूजन झाले असून या कामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे, त्यामुळे भागातील दुर्गंधीवर मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
या कामाला आ. संजय शिरसाट यांच्या प्रयत्नांमुळे गती मिळाली आहे असून मागील अनेक वर्षांपासून उत्कर्ष नगर भागातील नागरिक ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणी करीत होते. या मागणीस न्याय देत आ. शिरसाट यांनी तातडीने निधी मंजूर करून, कामास गती दिली. या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी उपशहरप्रमुख रमेश बाहुले, विभागप्रमुख रणजित ढेपे, शाखाप्रमुख रामेश्वरवर पेंढार, सुरेश बाहुले, संजय भूजबळ, मयूर पाटील, रजनी नाईक, मंगला सुदामे, वैशाली जहागीरदार, मानसी जेवळीकर, मुकुंद जेवळीकर, दिगंबर नाईक व नागरिकांची उपस्थिती होती.
Leave a comment