औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2373 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1915 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 223 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 127 आणि ग्रामीण भागातील 96 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 128 पुरूष आणि 95 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 4522 आढळले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आज सायंकाळनंतर 12 कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये 06 पुरूष आणि 06 महिला आहेत. औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. रामकृष्ण नगर, गारखेडा परिसर (1) आरेफ कॉलनी (1), कैसर कॉलनी (1), राजा बाजार (1), अजिज कॉलनी , नारेगाव (1), गल्ली क्रमांक 27, बायजीपुरा (1), बजाज नगर (2), रेल्वे स्टेशन परिसर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
ग्रामीण भागातील रुग्ण
ग्रामीण भागात जाळे बोरगाव, खुल्ताबाद (1), वाळूज (1) सलामपुरा नगर, वडेगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
काल 80 जणांना सुटी
एकूण 80 कोरोनाबाधित रुग्णांना आज सुटी देण्यात आलेली आहे. या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत 68, उर्वरीत 12 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयामध्ये (घाटी) 24 जून रोजी रोशन गेट येथील 68 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीमध्ये आतापर्यंत एकूण 177 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 174 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात वैजापुरातील 43 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 174, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 59, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 234 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
Leave a comment