भराड़ी । वार्ताहर
छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्यत सामाजिक समतेची बीजेरोवून सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी सामाजिक न्याय दिला असून आजचे पुढारी हे फक्त भाषणात हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकराचा आले सागतात मात्र प्रत्यक्ष मात्र ते सामाजिक समता पाळताना दिसत नाही. जर त्यांनी सामाजिक समता पाळली असती तर अनुसूचित जातीतील मातंग समाज ीरक्ष राजकरणा पासून दूर राहिला नसता. या राजकारण्यानी शाहू महाराजाचा सामाजिक समतेचा आदर्श घेत मातंग समाजाला खर्या अर्थाने सामाजिक न्यायसह सर्वच क्षेत्रात न्याय द्यावा असे प्रतिपादन विश्वसाहित्य रत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सचिन साबळे यांनी केले आहे.
दलितमित्र गयाबाई साबळे प्रतिष्ठाण व विश्वसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या सयुंक्त विद्यमाने आरक्षण क्रांतीचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमिताने अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. अनिल साबळे, संजय जाधव, विकास पवार , राम गायकवाड , अजय मानकर, नितीन कांबळे, रोहित सोनावणे, प्रकाश कांबळे, प्रशांत साबळे.
Leave a comment