औरंगाबाद । वार्ताहर
लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूं विरोधात लढाईत सामाजिक कार्य करणार्या आणि कोरोना विषयी जनजागृती करणार्या समाजसेवकांना,आरोग्य कर्मचार्यांना,डॉक्टरांना, पोलीसांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यासाठी औरंगाबादेतील समाजसेवक तथा पत्रकार गणेश पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे.या सामाजिक कार्यास चालना देण्याऐवजी अहमदनगर येथील एका सामाजिक व्हॉटसअप ग्रुपवर गणेश पवार यांच्या विषयी टीका टिप्पणी करून सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्राची बदनामीकारक मजकूर व्हायरल करणार्या तीन व्यक्तींविरोधात गणेश पवार यांनी औरंगाबाद सायबर विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, गणेश पवार यांनी काही दिवसांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातील कोरोना बद्दल सेवा कार्य,अन्नधान्य वाटप करणे, आरोग्य सेवा,अशा विविध प्रकारच्या सेवाभावी व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्याची शहानिशा करून त्यांना देशपातळीवरील सामाजिक संघटनेच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांनीही घ्यावी हा मुख्य उद्देश त्यामागे होता.आपले कार्य पाहून नगर जिल्ह्यातील समाजकंटकांनी सोशल मीडियाच्या व्हॉटसअप ग्रुपवर गणेश पवार यांची बदनामी करणारे अनेक मॅसेजेस व्हायरल करण्यात आले आहेत.या मॅसेजेसमुळे समाजात गणेश पवार यांच्या प्रतिष्ठेला आणि सामाजिक कार्याला बाधा पोहोचली आहे. सामाजिक कार्य संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने व जळ प्रवृत्तीच्या भावनेतून या ग्रुपवरील दिपक प्रभाकर नागले (रा. बाभळेश्वर),बद्री लोखंडे (रा. शिर्डी) या दोघांनी अनेक मॅसेजेस सतत व्हायरल केलेले आहेत. तसेच सदरील ग्रुपचे अॅडमिन संदीप सोनवणे (रा अहमदनगर) यांनीही गणेश पवार यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रुपमधून रिमूव्ह केले.परिणामी हा प्रकार सहन न झाल्याने अखेरीस पवार यांनी या तिघांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. त्यांनी सदरील निवेदन अधिक तपासासाठी सायबर विभागाकडे पाठविले आहे.सदरील तिघा व्यक्तींचे संबंधित ग्रुपवरील मॅसेजेसचे स्क्रीन शॉटस् आणि मोबाईल क्रमांक पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत.
Leave a comment