औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील कंपन्यांमधील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या परिसरात कोरोना संसर्गाचा प्रसार वाढू नये, यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी संबंधित अधिकार्यांना आज दिले.
वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज कंपनीच्या बजाज विहार कोविड केअर सेंटर, प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर, बजाज नगर या ठिकाणांची पाहणी करताना श्री. चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, तहसीलदार किशोर देशमुख यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या पाहणी दरम्यान कोविड केअर केंद्रातील सुविधा, करावयाच्या उपाययोजना, प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतही कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
Leave a comment