सोयगाव । वार्ताहर
सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील कु.सायली अशोक सोळंके ह्या तरुणीची उपजिल्हाअधिकारीपदी निवड होताच लोकप्रतिनीधीसह अनेक अधिकार्यांनी देखील वरठाण गावास भेट देवुन कु.सायली सोळंकेचे पुष्पगच्छ देत सत्कार करण्यात येत आहे.
दररोज गावात एकतर राजकीय पुढारी नाहीतर अधिकारी कींवा समाजसेवक असे जणु वरठाण नगरीमध्ये आनंदाची लाटच उसळली असुन ठीकठीकाणी सायली सोळंकेचे बँनर लावण्यात आले असुन सोशल मिडीयाद्वारे देखील मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे वरठाण येथील प्रत्येक नागरीकाला खुप मोठा अभिमान असुन कु. सायली सोळंकेने वरठाण ह्या खेड्या गावाचे नाव उचावर घेवुन गेल्याने समस्त ग्रामस्त आनंदीत आहे सुरवातीपासुन सायलीच्या आई वडील व काकाचे स्वप्न होते की तु मोठी अधिकारी झाली पाहीजे ते स्वप्न आज साक्षात उजाळाला आले आहे गेल्या दोन दीवसात शुभेच्छाचा वर्षाव झाला यावेळी आमदार उदयसिंग राजपुत ,सोयगावचे तहसिलदार प्रविण पांडे ,सोयगाव सहा. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, समाज कल्याण सभापती मोनालीताई राठोड , शिवसेनाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, नंदुबापु सोळंके,बनोटी बीट जमादार योगेश झाल्टे, विकास लोखंडे,विनोद कोळी, धरमसिंग सोळंके, तलाटी डी.पी.खरात ग्रामसेविका शारदा पवार, पोलीस पाटील नरेद्र सोळंके ,विजयसिंग सोळंके, केद्रंप्रमुख सचिन पाटील,मुख्यध्याक ठाकरे सर , राजेद्र चौधरी , भिकन सोळंके,अनिल सोळंके, प्रदीप शिंदे , फीरोज ताबोळी,आदी सह उपस्थित होते,
Leave a comment