खुलताबाद । वार्ताहर
सध्या गंगापुर-खुलताबाद मतदार संघात खरीप हंगामाची तयारी सुरू असून त्यादृष्टीने शेतकरी बांधव पीक कर्जासाठी बँकेमध्ये चकरा मारत आहे. परंतु अनेक शेतकरी बांधवांच्या तक्रारी अश्या आहे की पीक कर्ज उपलब्ध करून देणेस बँका टाळाटाळ करीत असून सदरील बँकांचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत, पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
आमदार प्रशांत बंब यांनी गंगापुर-खुलताबाद मतदार संघातील सर्व शाखा व्यवस्थापकांना पत्राद्वारे नम्र विनंती आहे की, सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण देश हे संकटात सापडले असून अशावेळी फक्त शेतकरी बांधव ताठ मानेने अन्नधान्य पिकवण्याच्या तयारीला लागलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रचंड संकटात देखील शेतकरी बांधव जगाचा पोशिंदा म्हणून कामाला लागलेला असताना बँकांकडून त्याची पिळवणूक होणे ही अत्यंत गंभीर व निंदनीय बाब आहे. तालुक्यातील बँकेत येणार्या प्रत्येक शेतकरी बांधवा सन्मानपूर्वक वागणूक देऊन, त्यास पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.अशी माहिती गंगापुर-खुलताबाद चे आमदार प्रशांत बंब यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे.
Leave a comment