औरंगाबाद । उमेश पठाडे
घर उभारण्यासाठी वीट, वाळू, सिमेंट या वस्तू आवश्यकच आहे. त्या शिवाय घर उभारुच शकत नाही. मात्र औरंगाबादेत ना वीट, ना वाळू, ना सिमेंटचा वापर करीत त्यांनी चक्क आठ दिवसात स्टिलचा बंगला उभारला आहे. त्यामुळे हा बंगला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
या पर्यावरणपूरक बंगला शहरातील भाग्यनगर भागात दोन हजार चौरस फुटाच्या फ्लॉटवर उभारला आहे. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये अवघ्या आठ दिवसात स्टीलच्या वापरातून तीन मजली आलिशान इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीच्या पायापासून घरातील इंटेरिअरपर्यंत सर्वकाही पर्यावरणपूरक आहे. तीन मजल्यावर प्रत्येकी एक हजार चौरस फुटांचे बांधकाम आहे. बाहेरील भिंतीसाठी हालो क्ले ब्लॉक्स वापरले आहेत. यामुळे बाहेरच्या तुलनेत घरातले तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस कमी राहते. घर उन्हाळ्यात थंड तर थंडीत गरम राहते. घराच्या आत एकही भिंत नाही. त्याची जागा फर्निचर पार्टीशनने घेतली आहे. यामुळे वाटेल तेव्हा खोल्यांचा आकार बदलणे शक्य होते. भिंती नसल्याने विटा, सिमेंट, प्लास्टर, पीओपी आणि रंगांचा खर्च वाचला आहे. असे घरमालकाने सांगितले आहे.
Leave a comment